पांचाळ सोनार डॉट कॉम या वेबसाईट मध्ये फक्त पांचाळ सोनार समाजाच्या प्रथम व घटस्फोटीत स्थळांची नाव नोंदणी केली जाईल.
ज्यांची नोंदणी करता आहात ते वधु किंवा वर सज्ञान असणे आवश्यक आहे.
जरी तुम्ही वेबसाईटरुन तुमची नोंदणी केलेली असली तरी तुम्हाला तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडाटा फॉर्म , फोटो व पत्रिका लिखित पाठवणे आवश्यक आहे.
पांचाळ सोनार डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्या मुलाची किंवा मुलीची माहीती दाखविणे ही सेवा विनामोबदला आहे त्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.
नाव नोंदणीची फी ५००/- रु प्रती वर्षी आकारली जाईल.
सदरची नाव नोंदणी ही एक वर्षासाठी असेल. एक वर्षानंतर सभासदांना परत नाव नोंदणी करावी लागेल.
पांचाळ सोनार डॉट कॉम वर-वधु दोघांसाठी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी सदस्यांनी आपली खरी माहीती द्यावी.
पांचाळ सोनार डॉट कॉम माध्यमातून लग्न जमल्यास कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही.
पांचाळ सोनार डॉट कॉम मधील कोणतेही स्थळ हे आपल्या स्थळाला योग्य आहे असे वाटल्यास पांचाळ सोनार डॉट कॉ’ आपल्याला त्या स्थळाशी संपर्क साधून देईल.
नांव नोंदवल्यावर विवाह किती दिवसात जमेल याची कोणतीही जबाबदारी पांचाळ सोनार डॉट कॉम घेणार नाही.
फीची रक्कम जमा झाल्यावर प्रत्येक सभासदास आयडी नं. व पासवर्ड देणेत येईल.
आपण निवडलेल्या स्थळाची वैयक्तिक माहीती स्वतः पडताळून मगच निर्णय घ्यावा. त्याबाबतीत पांचाळ सोनार डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
कोणत्याही स्थळाने खोटी माहीती दिल्यास अगर माहीतीचा गैरवापर केल्यास पांचाळ सोनार डॉट कॉम मधून त्या स्थळाची माहीती रद्द करणेत येईल.
आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमल्यास त्याची आम्हाला तत्काळ माहीती द्यावी, आम्ही आपल्या मुलाचा किंवा मुलीचा प्रोफाईल वेबसाईटवरुन काढुन टाकू.
अधिक माहीतीसाठी पांचाळ सोनार डॉट कॉम येथील पत्यावर संपर्क साधावा.
आपणास आपली नांव नोंदणी आमचेकडे करावयाची असल्यास कृपया खालील कागदपत्राद्वारे करावी.
आपला १ फोटो, संपूर्ण बायोडेटा व संपूर्ण पत्रिका.
वरील सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष द्यावीत किंवा पोस्ट, कुरियरने पाठवावीत. पांचाळ सोनार डॉट कॉम फी रोखीने किंवा चेकने स्विकारली जाईल. फी मध्ये कोणतीही तफावत राहणार नाही. एकदा भरलेली कोणत्याही कारणाने परत दिली जाणार नाही.. चेक किंवा डी.डी. अग्निज डिझायनर्स या नावावर काढावा व कोल्हापूर ऑफीसच्या पत्यावर पाठवावा.
Internet Banking
Bank Account Name : Agnis Designers
Bank Account No. : 090220110000017
IFSC Code : BKID0000902
SWIFT No : BKID INB BPMB